पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आणखी एका मंदिरांवर आक्रमण होण्याची शक्यता ! – हिंदु नेत्याची भीती
पाकमधील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित !
पेशावर (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये काही आठवड्यांपूर्वीच हिंदूंच्या एका मंदिराची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर येथील हिंदु नेते हारून सरब दयाल यांनी येथील अन्य एका मंदिरावर आक्रमण होण्याच्या शक्यतेने मंदिराला संरक्षण देण्याची मागणी प्रांतीय सरकारकडे केली आहे.
aपाकिस्तान में अल्पसंख्यक हिंदू समुदाय की एक और धरोहर खतरे में हैं#Pakistan https://t.co/HmV5ZWw0HP
— Zee News (@ZeeNews) January 18, 2021
हारून सरब दयाल यांनी सांगितले की, हवेलियन नगर येथे असलेल्या एका प्राचीन मंदिराला धोका आहे. या मंदिराच्या परिसरात एक अन्य प्राचीन ढाचा आहे. भू माफिया हा ढाचा तोडण्याची शक्यता आहे. एका सुनियोजित पद्धतीने मंदिरावर आक्रमण होण्याची शक्यता आहे. येथील काही जण मंदिरांवर नियंत्रण मिळवू इच्छित आहेत, जेणेकडून देशात अराजक निर्माण व्हावे.
Hindu community leader Haroon Sarab Dayal said the temple in Havelian city is an old structure and now the land mafia is out to destroy this heritage.https://t.co/1ayCgP9noO
— WION (@WIONews) January 17, 2021
केवळ याच मंदिराच्या संरक्षणाच्या संदर्भात सूत्र नाही, तर संपूर्ण पाकमधील हिंदूंच्या शेकडो मंदिरे, धर्मस्थळे, विद्यालय, अनाथाश्रम, स्मशानभूमी, सत्संग भवन, गुरुद्वारा आणि अन्य उपासना स्थळे यांनाही संरक्षण देण्याची आवश्यकता आहे.