प्राचीन नालंदा विद्यापिठाचे वैभव जाणा !

१. ‘नालंदा हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ आहे.

२. या विद्यापिठात अनुमाने १० सहस्र विद्यार्थी ज्ञानार्जन करत होते, तर २ सहस्र शिक्षक ज्ञानदान करत होते.

३. या विद्यापिठात ज्ञानाजर्नासाठी कोरिया, जपान, चीन, तिबेट, इंडोनेशिया, पर्शिया आणि तुर्की येथून विद्यार्थी आणि विद्वान येत.

४. येथे वेद, विज्ञान, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, योगशास्त्र, तर्कशास्त्र, मेटाफिजिक्स (तत्त्वज्ञान) आदी विषयांवरील शिक्षण दिले जात असे.

५. या विद्यापिठातील ग्रंथालय विशाल होते. या ग्रंथालयाच्या ‘रत्नरंजक’, ‘रत्नोदधि’ आणि ‘रत्नसागर’, अशा ३ भवनांमध्ये विभागलेले होते. ५ व्या शतकाच्या आरंभीस गुप्त राजवंशाच्या शक्रादिया यांनी हे स्थापित केले होते. या विशाल ग्रंथालयात अनेक विषयांवरील एकूण ३ लाखांहून अधिक पुस्तकांचा संग्रह होता. हे ग्रंथालय इतके मोठे होते की, वर्ष ११९९ मध्ये क्रूरकर्मा इख्तियारुद्दीन महंमद बिन बख्तियार खिलजी या इस्लामी आक्रमकांने हे ग्रंथालय जाळले, त्यानंतर ३ मासांनंतरही धूर येतांना दिसत असे. प्रथम युरोपियन विद्यापीठ हे बोलोगाएनए (इटली) मध्ये १०८८ मध्ये स्थापन झाले होते.

६. नालंदा विद्यापिठाच्या आतमध्ये १० मंदिरे होती. यासह ध्यानधारणा करण्यासाठी सभागृहही होते.’

(साभार : व्हॉट्सअ‍ॅप)