अमेरिकेकडून पाकपुरस्कृत लष्कर-ए-तोयबासह ८ आतंकवादी संघटना ‘विदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीत कायम !
अशा आतंकवादी संघटनांना केवळ सूचीमध्ये न टाकता त्यांचा नायनाट करणे आवश्यक !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटनेला ‘परदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीमध्ये कायम ठेवले आहे. तसेच पाकमधील ‘लष्कर-ए-झांग्वी आणि अन्य ६ जिहादी आतंकवादी संघटनांनाही जागतिक आतंकवादी संघटनेच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
१. पाकिस्तान सध्या आर्थिक अपव्यवहार प्रतिबंधक दलाच्या (एफ्.ए.टी.एफ्.च्या) ग्रे (करड्या) सूचीमध्ये आहे. आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा थांबवण्यासह २७ सूत्री कारवाई योजनेची कार्यवाही करणे पाकला बंधनकारक आहे. तसे न झाल्यास पाकचा काळ्या सूचीमध्ये समावेश होऊ शकतो. एफ्.ए.टी.एफ्.च्या शेवटच्या बैठकीत पाकने केवळ २१ सूत्रांवर काम केल्याचे स्पष्ट झाले होते.
२. पाक ग्रे सूचीतून बाहेर आला नाही, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि युरोपीय संघ यांचे आर्थिक साहाय्य मिळणेही कठीण होणार आहे.