औरंगजेबाप्रती प्रेम कशासाठी ?
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकार परिषदेत प्रश्न
सोलापूर – औरंगाबादला संभाजीनगर संबोधणे आणि नामांतर करणे हा तेथील नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे. लोकांच्या भावनांचा विचार सरकार करत आहे. खरे तर औरंगजेबाप्रति प्रेम कशासाठी ? छत्रपती संभाजी महाराजांना महत्त्व द्यायचे कि औरंगजेबाला ?, असा प्रश्न शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
महापालिका आणि नगरपालिका यांच्या पदाधिकार्यांच्या आढावा बैठकीनंतर सात रस्त्यावरील नियोजन भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापालिकेच्या समांतर उजनी जलवाहिनी आणि शहरातील उड्डाणपूल यांना त्वरित निधी दिला जाईल. यापुढे निधीअभावी प्रकल्प रखडला जाणार नाही, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.