धावत्या लोकलमधून हिंदु पत्नीला ढकलून देणार्या धर्मांधाला अटक
‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी धर्मांधावर कडक कारवाई करण्याची हिंदूंची मागणी
|
मुंबई, १७ जानेवारी (वार्ता.) – धावत्या लोकलमधून अन्वर अली शेख याने त्याच्या हिंदु पत्नीला ढकलून दिल्याची घटना घडली आहे. महिला प्रवाशाच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून अन्वर अली शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. (हिंदु मुलींनी धर्मांधांशी निकाह केल्यावर काय होते, हे जाणा ! कायद्याचे भय नसलेल्या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई झाल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हिंदु मुलींचे जीव वाचतील ! – संपादक) ‘या धर्मांधावर कडक कारवाई झाली पाहिजे’ अशी मागणी जागृत हिंदूंकडून होत आहे.
Mumbai: Anwar Ali Shaikh arrested for ‘dropping’ his wife Poonam Chavan from a moving train, booked for murderhttps://t.co/CK46JVI5iZ
— OpIndia.com (@OpIndia_com) January 14, 2021
केवळ एक मासापूर्वी पूनम चव्हाण यांच्याशी ३९ वर्षीय अन्वर अली शेख याने निकाह केला होता. निकाहानंतर हे दोघेही मानखुर्द येथील चाळीत रहात होते. लोकलमधून प्रवास करतांना अन्वर अत्यंत धोकादायक पद्धतीने लोकलच्या दरवाज्यात उभा होता. या वेळी पूनम या केवळ अन्वरच्या हातांच्या आधारे उभ्या होत्या. गाडी वेगात धावत असतांनाच अन्वरने हातांचा आधार काढला आणि पूनम रूळांवर पडल्या. (धर्मांधांच्या प्रेमाच्या प्रलोभनांना बळी पडून त्यांच्याशी निकाह करणार्या हिंदु तरुणी यातून काही बोध घेतील का ? – संपादक) हा सगळा प्रकार प्रत्यक्षदर्शी एका महिलेने पाहिला. गाडीतून ढकलण्यापूर्वी अन्वरने पूनम यांना जवळ घेतले आणि मग ढकलून दिले.
लोकल गोवंडी स्थानकावर थांबताच महिलेने स्थानकातील पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी तातडीने अन्वर अली शेख याला कह्यात घेतले. या प्रकरणी अधिक अन्वेषण चालू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.