‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले ज्ञान चित्तात अनंत काळापर्यंत टिकते’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !
केरळ राज्यातील कोल्लम येथे प.पू. माता अमृतानंदमयी यांचा आश्रम आहे. प.पू. माता अमृतानंदमयी यांच्या आश्रमात काही दिवसापूर्वी बी. टेक्. अभ्यासक्रमात शिकणारी एक तरुण मुलगी तिच्या आई-वडिलांसह आली होती. त्या तरुणीने कपाळावर कुंकू लावलेले नव्हते. या आश्रमातील एक उत्तरदायी शिष्य स्वामी कृष्णप्रसाद यांनी त्या तरुणीच्या आईला त्याचे कारण विचारले. त्यावर त्यांनी सांगितले की, मुलगी आधुनिक विचारांची आहे. स्वामींनी त्या मुलीला आणि तिच्या आईला सांगितले की, महिलांनी कपाळावर कुंकू लावणे आध्यात्मिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे, याची उपयुक्त माहिती सनातन संस्था देऊ शकते. त्यांनी मला संपर्क करून ‘महिलांनी कपाळावर कुंकू का लावावे ? याची माहिती घेतली आणि त्यांना सांगितली.
काही वर्षांपूर्वी स्वामी कृष्णप्रसाद सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘महिलांनी कपाळावर कुंकू लावण्याचे महत्त्व’ या विषयावरील भित्तीपत्रक पाहिले होते, तसेच त्याविषयीची माहिती ऐकली होती. हे सर्व त्यांना आठवले. यावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले आध्यात्मिक ज्ञान प्रत्येक व्यक्तीच्या चित्तात अनंत काळापर्यंत टिकून असते’, हे दिसून येते.
– श्री. नंदकुमार, कोची, केरळ.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |