संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यात्वाचे नेपाळकडून समर्थन !  

नेपाळच्या या भूमिकेमुळे चीनचा थयथयाट !

भारताच्या कूटनीतीक प्रयत्नांमुळे नेपाळ भारताच्या बाजूने झुकत असेल, तर ते चांगलेच आहे; मात्र नेपाळमध्ये साम्यवादी सरकार सत्तेत असेपर्यंत तेथील शासनकर्त्यांवर विश्‍वास ठेवणे धाडसाचे ठरेल, हेही तितकेच खरे !

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यात्वाचे नेपाळने समर्थन केले आहे. यानंतर लगेचच नेपाळमधील चीनच्या राजदूतांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेऊन याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. (संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये चीनला सदस्यत्व मिळण्यासाठी नेहरूंनी प्रयत्न केले; मात्र आज हाच चीन भारताला सदस्यत्व मिळू नये, यासाठी प्रयत्न करतो ! चीनचा भारतद्वेष जाणा ! – संपादक)

१. नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली हे भारताच्या ३ दिवसीय दौर्‍यावर आले होते. त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांची भेटही घेतली होती. या भेटीमध्ये अनेक महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा झाली.

नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

२. ग्यावली म्हणाले की, नेपाळ देशांतर्गत राजकारणात कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारणार नाही. अंतर्गत समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेपाळ सक्षम आहे. भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश सीमावादावर तोडगा काढण्यासाठी सक्षम असून त्यावर विचारही चालू आहे. (नेपाळशी असलेल्या सीमावादावर भारताने चर्चा करण्यात वेळ न घालवता तेथील साम्यवादी सरकारला समजेल, त्याच भाषेत कृती करणे आवश्यक ! – संपादक)