चीनमध्ये आईस्क्रीममध्येही आढळले कोरोनाचे विषाणू !
बीजिंग (चीन) – चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या आईस्क्रीमच्या ३९० डब्यांची विक्री करण्यात आली असून खरेदी करणार्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. ज्या आस्थापनाच्या आईस्क्रीममध्ये कोरोनाचे विषाणू सापडले आहे ते आस्थापन प्रशासनाने बंद केले आहे. या आस्थपनामध्ये आता सॅनिटायझेशन केले जात आहे. तसेच आस्थापनातील कार्यरत कर्मचार्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. या आईस्क्रीममध्ये न्यूझीलंडमधील दूध भूकटी आणि युक्रेनमधील दह्याच्या भूकटीचा समावेश केला जातो. हे पदार्थ परदेशातून मागवण्यात आल्याचे आस्थापनाने सांगितले असल्याचे सरकारने म्हटले आहे.
The #coronavirus was found on #icecream produced in eastern #China, prompting a recall of cartons from the same batch, according to the governmenthttps://t.co/Nq8FoVCqd5
— FinancialXpress (@FinancialXpress) January 17, 2021
(सौजन्य : One india Hindi)