शेतकरी वळले मसाला पिकांकडे
यवतमाळ – जिल्ह्यातील ६० टक्के शेतकर्यांनी कापूस, सोयाबीन या पिकांमध्ये हानी झाल्याने येत्या हंगामात या पिकांऐवजी मसाला पिकांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पुढील हंगामासाठी बियाण्यांची आगाऊ मागणी करतांना, हळद, कांदा, आले आणि लसूण अशा मसाले पिकांच्या बियाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे लक्षात आले आहे.