सरस्वतीदेवीचा अपमान केल्याप्रकरणी यशवंत मनोहर यांची महाराष्ट्र करणी सेनेकडून पोलिसात तक्रार
मुंबई – कवि यशवंत मनोहर यांनी १४ जानेवारी नागपूर येथे झालेल्या विदर्भ साहित्य संघामध्ये झालेल्या कार्यक्रमात हिंदूंची आराध्य देवता सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवण्यास विरोध केल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची, तसेच बौद्ध आणि हिंदु धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करून त्यांना अटक करण्याची मागणी पोलीस ठाण्यात केली आहे. २ धर्मांत वैमनस्य निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे.
सरस्वतीदेवीची प्रतिमा कार्यक्रमात ठेवण्यात येते म्हणून यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दिला जाणारा जीवनव्रती पुरस्कार नाकारला. ही प्रतिमा काढण्यास त्यांनी अध्यक्ष म्हैसाळकर यांना सांगितले होते; परंतु अध्यक्ष म्हैसाळकर यांनी त्यांचा श्रद्धेचा भाग असल्याचे सांगून नम्रपणे नकार दिला.