पुण्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू
पुणे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते १६ जानेवारी या दिवशी येथील कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू झाली. जिल्हा रुग्णालय, आैंध येथे मोहीम चालू झाली असून पुणे जिल्ह्यात सायंकाळपर्यंत ३१ केंद्रांवर ३ सहस्र १०० जणांना लस देण्यात आली. ‘को-विन पोर्टल’वर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाईल, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.