सर्व आरोग्य कर्मचार्यांनी कोरोनाची लस घेऊन मोहिमेस सहकार्य करावे ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचार्यांनी कोरोना योद्धा म्हणून चांगले काम केले आहे. कोणतीही भीती न बाळगता सर्व आरोग्य कर्मचार्यांनी कोरोनाची लस घ्यावी आणि या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे १६ जानेवारी या दिवशी जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आरोग्य सेवा विभाग कोल्हापूरचे उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय नांद्रेकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अपर्णा गावकर, डॉ. संदेश कांबळे यांच्यासह आरोग्य विभागाचे आधुनिक वैद्य आणि कर्मचारी उपस्थित होते.