अयोध्येतील राममंदिरासाठीच्या निधीसमर्पण मोहिमेला पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरातून प्रारंभ
पणजी, १६ जानेवारी (वार्ता.) – अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रावरील २.७ एकर भूमीत ५७ सहस्र ४०० चौरस फूट क्षेत्रामध्ये पुढील ३ वर्षांत भव्य अशा राममंदिराची उभारणी केली जात आहे. या अनुषंगाने उद्योजक श्रीनिवास धेंपो यांच्या अध्यक्षतेखाली गोवा समर्पण निधी समितीने गोव्यात निधी समर्पण मोहिमेला प्रारंभ केला आहे. येथील श्री महालक्ष्मी मंदिरात १५ जानेवारी या दिवशी या मोहिमेला प्रारंभ झाला.
या मोहिमेविषयी माहिती देतांना उद्योजक श्रीनिवास धेंपो म्हणाले, ‘‘अयोध्येत राममंदिराच्या उभारणीसाठी निधी समर्पण मोहीम एक मास चालणार आहे. हे एक जनसंपर्क अभियान आहे. अयोध्येत राममंदिरच नव्हे, तर एक आध्यात्मिक केंद्र उभे रहाणार आहे. मंदिराच्या रचनेवरून ही गोष्ट स्पष्ट होऊ शकते. सर्व भारतियांनी यथाशक्ती निधी समर्पण करून मंदिर उभारण्यासाठी हातभार लावला पाहिजे.’’
‘श्रीरामजन्म निधी अभियान ट्रस्ट’ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कुटुंबियांकडून ५ लाख रुपयांची देणगी
‘श्रीरामजन्म निधी अभियान ट्रस्ट’ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कुटुंबियांच्या वतीने ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.