नागपूर खंडपिठाची पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस
नॉयलॉन मांजाने मनुष्य आणि पक्षी यांचे बळी घेतल्याचे प्रकरण
नागपूर – संक्रांतीला वापरलेल्या नायलॉन मांजाने अनेक पक्षी घायाळ झाले. घायाळ पक्ष्यांवर ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’वर उपचार करण्यात आले. ज्या पंखाच्या भरवश्यावर पक्षी आकाशात उंच भरारी घेऊ शकतात, त्यावरच मांजाची कुर्हाड चालली. ‘आनंद साजरा करा; पण नायलॉन मांजा वापरू नका’, असे आवाहन सेंटरने केले आहे. बंदी घालण्यात आलेल्या नॉयलॉन मांजाच्या सर्रास वापराविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस पाठवून २ दिवसांत नोटिसीवर उत्तर सादर करण्याचा आदेश दिलो.
गेल्या काही दिवसांत नॉयलॉन मांजामुळे काही व्यक्तींचे प्राण गेले असून त्याचा फटका आता पक्षांनाही बसत आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या दिशा निर्देशांचे पालन होत नसल्याने न्यायालयाने स्वतःच १३ जानेवारी या दिवशी जनहित याचिका प्रविष्ट करून राज्याच्या पर्यावरण विभागाला ही नोटीस बजावली आहे. खंडपिठाने नायलॉन मांजाच्या घातक परिणामांची गंभीर नोंद घेतली आहे. या याचिकेवर १४ जानेवारी या दिवशी सुनावणी घेण्यात आली.