सरकारचा एक तरी विभाग लाजिरवाणा नाही, असे आहे का ?
‘सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ‘कोविड सेंटर’ म्हणून घोषित करण्यात आले होते. सोलापूर जिल्हा कारागृहातील कोरोनाबाधित आणि संशयित बंदीवानांना उपचारासाठी येथे ठेवण्यात आले होते. मुलींच्या वसतीगृहात असलेल्या ‘कोविड सेंटर’मधील कपाटांचे कुलूप तोडून साहित्याची नासधूस करणे, कागदपत्रे आणि पैशांची चोरी करणे, तसेच मुलींच्या कपड्यांवर अश्लील लिखाण करणे असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. ही बंदी किती दिवस असणार, याची निश्चिती नसल्याने वसतीगृहात रहाणार्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे साहित्य वसतीगृहातच ठेवले होते.’