राज्यात कोरोनाचे संकट ओसरत असले, तरी चिंता कायम !
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात रुग्णवाढीची संख्या घटत आहे. तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने अल्प अधिक होत आहे. १४ जानेवारी या दिवशी एकूण मृतांचा आकडा ५० सहस्र २९२ इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे. १५ जानेवारी या दिवशी ३ सहस्र ५७९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ८१ सहस्र ६२३ इतकी झाली आहे. राज्यात ३ सहस्र ३०९ रुग्णांनी कोरोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ७७ सहस्र ५८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके आहे.