अल्पवयीन मुलीला ‘हिंदु’ असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करणार्या धर्मांधाला अटक
उत्तरप्रदेश पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन केली अटक !
धर्मांध आता हिंदु नावे धारण करून युवतींचे धर्मांतर करत आहेत. अशांवर जरब बसवण्यासाठी कठोर कायद्यासह त्यांच्यावर वचक निर्माण करणे आवश्यक !
विजयपूर (कर्नाटक) – उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील एका अल्पवयीन मुलीला ‘हिंदु धर्मीय’ असल्याचे सांगून धर्मांध मेहबूब याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी महबूब याला कर्नाटकातील विजयपूर येथून अटक केली. त्याच्यावर लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मुलीचे वडील माजी सैनिक आहेत. या तरुणाने सामाजिक माध्यमांद्वारे या मुलीशी जवळीक वाढवली होती. नंतर नोकरीचे आमीष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.