‘आश्रम’ वेब सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे धर्मांधाकडून एका तरुणीची हत्या
आश्रम वेब सिरीजमधून हिंदूंच्या संतांचा, आश्रमव्यवस्थेचा अवमान करण्यात आला होता आणि आता त्याचा समाजावर काय परिणाम झाला हेही दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने आता याकडे गांभीर्याने पहात अशा वेब सिरीजवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
रांची (झारखंड) – येथे एका तरुणीचा शिरच्छेद करून हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शेख बिलाल याला अटक केली आहे. वेब सिरीज ‘आश्रम’ पाहून त्याने या तरुणीची हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे. या तरुणीचे शिर बिलाल याच्या शेतात पोलिसांना सापडले होते; मात्र धड सापडले नव्हते. त्यानंतर शोध घेतल्यावर तिचे धड २ किलोमीटर अंतरावर सापडले. त्यावरून पोलिसांनी बिलाल याला अटक केली. आश्रम वेब सिरीजमध्ये अशा प्रकारची घटना दाखवण्यात आली आहे. तरुणीची ओळख पटू नये; म्हणून असे करण्यात आले होते. या तरुणीची गळा दाबून हत्या केल्यानंतर शिर आणि तोंडावळा यांच्यावर वार करण्यात आले.