कोरोनाची उत्पत्ती कुठून झाली, हे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनच्या वुहानमध्ये पोचले !
एक वर्षांनंतर वुहानमध्ये जाऊन या पथकाला काय सापडणार आहे ? चीनने यापूर्वीच कोरोनाविषयीच्या संक्रमणाचे सर्व पुरावे नष्ट केले असणार, हे लहान मुलही सांगील !
बीजिंग (चीन) – कोरोना विषाणूच्या उगमाविषयी चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे १३ आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक चीनच्या वुहान शहरामध्ये पोचले आहे. पथकामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, रशिया, नेदरलँड, कतार आणि व्हिएतनाम येथील तज्ञ आहेत. या तज्ञांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. हे पथक संशोधन संस्था, रुग्णालये आणि मासे विक्री करण्यात येणार्या बाजारपेठेतील लोकांशी चर्चा करणार आहे. या बाजारपेठेतून कोरोनाचा सर्वप्रथम संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे.