मृत महिलेचा पुनर्जन्म होणार असल्याचे सांगत शव २० दिवस घरात ठेवण्यास भाग पाडणार्या पाद्रयाला अटक
हिंदूंना ‘अंधश्रद्धाळू’ म्हणून हिणवणारे तथाकथित पुरो(अधो)गामी अन्य धर्मियांच्या अशा अंधश्रद्धांवर मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
डिंडीगुल (तमिळनाडू) – येथील पाद्री सुदर्शनम् याने एका महिलेचा मृत्यू झाला असतांनाही ‘ती झोपली असून काही दिवसांनी तिचा पुनर्जन्म होईल’, असे सांगत तो मृतदेह २० दिवस घरातच ठेवण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी पाद्री सुदर्शनम् आणि अन्य एका महिलेला अटक केली आहे.
Tamil Nadu: Cops arrest Christian pastor after corpse of female constable was kept in house for over 20 days in hopes of ‘resurrection’https://t.co/s5ogytqwal
— OpIndia.com (@OpIndia_com) January 2, 2021
येथे ३८ वर्षीय अण्णाई इंद्रा नावाच्या महिला पोलीस शिपायाचा मृत्यू झाला होता. पाद्री सुदर्शनम् याने इंद्रा यांच्या मुलींना सांगितले, ‘तुमच्या आईचा मृत्यू झालेला नाही, तर ती केवळ झोपली आहे. तुम्ही तिला उठवाल, तर तिचा पुनर्जन्म होणार नाही.’ यामुळे २० दिवस शव घरात ठेवल्यानंतर ते सडू लागल्याने दुर्गंध येऊ लागल्यावर शेजार्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.