साधनेमुळे निर्माण होणारी सात्त्विकता, निर्मळता, प्रीती इत्यादी गुणांमुळे अन्य युगांप्रमाणे कलियुगातही पशूपक्षी आकर्षित होणारे सनातनचे साधक, संत आणि आश्रम !
१. शकुंतलेमध्ये असलेल्या दैवी गुणांमुळे कण्वमुनींच्या आश्रमातील पक्षी आणि प्राणी तिच्याकडे आकृष्ट होत असणे
‘कण्वमुनी आणि त्यांची पत्नी यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी शकुंतलेचा सांभाळ करून तिचे पालनपोषण केले. विश्वामित्र ऋषी आणि मेनका यांची सुकन्या शकुंतला हिचे संपूर्ण बालपण अन् तारुण्य कण्वमुनींच्या आश्रमात गेले. वनातील आश्रमाच्या परिसरातील पशूपक्षी आणि वृक्षलता शकुंतलेशी बोलत असत. हरीण, मोर, भारद्वाज आणि राजहंस तिच्याजवळ येत असत अन् शकुंतला त्यांना प्रेमाने कुरवाळत असे. शकुंतलेशी खेळतांना हरीण कधी तिला पाहून हर्षित होऊन उड्या मारत असे. तिला पाहून आनंदी झालेला मोर पिसारा फुलवून नाचत असे, तर तिच्या दर्शनाने कोकीळ मंजूळ गायन करत असे. शकुंतला उच्च स्वर्गलोकातील जीव असल्याने तिच्या भोवतीच्या सात्त्विक आणि सुगंधमय वायूमंडलाकडे, तसेच तिच्यातील भाव, प्रेमभाव अन् मनाची निर्मळता या दैवी गुणांमुळे तिच्याकडे पशूपक्षी, तसेच वृक्षलता आकृष्ट होत असत.
२. सनातनच्या आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांवर एक पक्षी येऊन बसणे आणि नंतर स्वतःच उडून जाणे
सत्य, त्रेता आणि द्वापर युगामध्ये ऋषीमुनींच्या आश्रमांत जे दृश्य पहायला मिळायचे, तसेच दृश्य कलियुगातील सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्या संदर्भातही पहायला मिळत आहे. २६.१२.२०२० या दिवशी सायं. ४.५० वाजता ‘केशरी डोक्याचा कस्तूर (Orange Headed Thrush)’ हा पक्षी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या पादुका ठेवल्या आहेत, त्या पादुकांवर बसून प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेकडे पाहत होता. ध्यानमंदिरात त्या पक्षाचे छायाचित्र काढण्यात आले, तरी तो तेथून हलला नाही. तो तेथेच बसून होता. अर्ध्या तासाने तो स्वत:च तेथून उडून गेला. असे अन्य काही पक्षी आणि पाखरे यांच्या संदर्भात झाले आहे.’
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
सनातनचे साधक किंवा संत यांच्या संदर्भात संरक्षणाची शाश्वती आणि सुरक्षितता असल्याने पक्षी त्यांच्याकडे आकृष्ट होणेप्राणी आणि पक्षी निसर्गतःच दुर्बळ असल्यामुळे अन्य प्राण्यांपासून रक्षण होण्यासाठी ते विविध प्रकारे प्रयत्नरत असतात; परंतु साधक अथवा संत यांच्याकडून त्यांच्या रक्षणाची शाश्वती आणि सुरक्षितता असल्यामुळेही काही पक्षी साधकांकडे आकृष्ट होतात आणि निश्चिंतपणे त्यांच्या सहवासात वावरतात. – कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |