रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष निजाम सय्यद यांच्याकडून हिंदु धर्मविरोधी लिखाणाविषयी जाहीर क्षमायाचना !
नागोठणे (जिल्हा रायगड) येथे सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्या ‘पोस्ट’विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी आवाज उठवला !
हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्या लिखाणाच्या संदर्भात आवाज उठवून संबंधितांना क्षमा मागण्यास भाग पाडणार्या जागृत धर्माभिमानी हिंदूंचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी असाच संघटितपणा दाखवल्यास हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्याची आगळीक कोणी करू धजावणार नाही !
(हे लिखाण देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
पनवेल – रोहा (जिल्हा रायगड) तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष निजाम सय्यद यांनी ४ जानेवारी या दिवशी सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे लिखाण २ गटांत ‘पोस्ट’ (प्रसारित) केले. याविरोधात नागोठणे येथील हिंदु जनजागृती मंचच्या सदस्यांनी तेथील पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सय्यद आणि मंचाचे अध्यक्ष श्री. योगेश ठाकूर यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तिथे सय्यद यांनी जाहीर क्षमायाचना करून क्षमापत्र लिहून दिले. या वेळी पोलीस ठाण्यात अनेक हिंदु धर्माभिमानी युवक आले होते. या तक्रारअर्जावर हिंदु जनजागृती मंचाचे उपाध्यक्ष श्री. मंदार चितळे, श्री. चेतन कामथे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष श्री. बापू रावकर यांनीही स्वाक्षरी केली आहे.
सय्यद यांनी पोस्ट केलेले हिंदुविरोधी लिखाण
‘आदमी भी कितना नादान है, मंदिरमे शंख और घंटा बजाता है । सोया हुआ है खुद और भगवान को जगाता है । भूखे को रोटी दे नही सकता, मंदिरमे छप्पन भोग लगाता है । अंधोरा दिलमे है और दिये मंदिरमे जलाता है ।’ ही हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट सय्यद यांनी प्रसारित केली होती. (अल्ला किंवा मशीद यांसंदर्भात असे काही लिखाण असते, तर सय्यद यांनी ते प्रसारित केले असते का ? हिंदु अतीसहिष्णु असल्यामुळेच हिंदु धर्माविषयी काहीही बोलू शकतो, असे अन्य पंथियांना वाटते ! – संपादक) या पोस्टमध्ये सय्यद यांनी श्रीकृष्णाच्या चित्राखाली स्वतःचे छायाचित्र, पक्षाचे पद आणि पक्षाचे चिन्ह ही टाकले होते. (पदाचा असा गैरवापर करणार्यांविषयी काँग्रेस पक्षातील पदाधिकार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक)
हिंदु जनजागृती मंचाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते, ‘सय्यद हे नागोठणे येथील शांतता समितीच्या बैठकीत येतात आणि गावात हिंदु-मुसलमान ऐक्याचे प्रतीक घेऊन फिरत असतात; परंतु या पोस्टमुळे त्यांच्या मनातील काळेबरे स्पष्टपणे बाहेर आले आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. गावातील शांतता भंग करण्याचाच सय्यद यांचा प्रयत्न आहे.’
सय्यद यांनी त्यांच्या क्षमापत्रात त्यांनी ही पोस्ट चुकून टाकल्याचे म्हटले आहे. (सय्यद यांचा खोटारडेपणा! अशा प्रकारे धर्मभावना टाकणारी पोस्ट स्वतःचे चित्र, पद, पक्ष आदींचा उल्लेख करून कोणी चुकून पुढे पाठवू शकत नाही. ही कृती हेतूपुरस्सर केली आहे, हे न समजण्याएवढे हिंदू दूधखुळे नाहीत ! – संपादक)