चिनी मांजा आणि दोरा यांवरील बंदीची कडक कार्यवाही करावी !
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे निवेदन
कोल्हापूर, १५ जानेवारी (वार्ता.) – मकरसंक्रांतीच्या सणापासून कोरडी हवा असल्याने पतंग उडवण्याची आपल्या देशात परंपरा आहे. अलीकडील काही वर्षांत चिनी मांजा आणि चिनी दोरा यांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यात अनेक पशू-पक्षी घायाळ झाले असून अनेकांचा बळी गेला आहे. मागील वर्षी शुक्रवार पेठेतील तरुणी रंकाळाकडून येत असतांना तिला गंभीर दुखापत झाली होती. तरी चिनी मांजा आणि दोरा यांवरील बंदीची कडक कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने नायब तहसीलदार अनंत गुरव यांना १४ जानेवारी या दिवशी देण्यात आले.
या वेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शहराध्यक्ष श्री. जयवंत निर्मळ, श्री. महेश उरसाल, पतितपावन संघटनेचे श्री. सुनील पाटील, हिंदू एकताचे चंद्रकांत बराले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सर्वश्री सुशील भांदीगरे, राहुल घाडगे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब नलवडे उपस्थित होते.