सहसाधकाने व्यष्टी साधनेविषयी दिलेले दृष्टीकोन ऐकून मनाला उभारी येऊन प्रयत्न करण्याचे ठरवणे
‘२२.१२.२०२० या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना सांगितले, ‘‘आपण रामनाथी आश्रमाच्या पवित्र वास्तूत रहात आहोत. आपण या वास्तूत असतांना देव आपल्याला देत असलेली आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याचा प्रयत्न करा, देव आपल्याला सुचवत असलेले विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करा.’’ तेव्हा मला २ दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.
१. सहसाधकाने व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन करणे
एक साधक (श्री. नीलेश सुर्वे) मला स्वागतकक्षात भेटला. आम्ही अनौपचारिक चर्चा करत असतांना मी त्याला संतांनी माझ्या व्यष्टी साधनेच्या गंभीर स्थितीविषयी केलेले भाष्य सांगितले. तेव्हा त्याने मला पुढील दृष्टीकोन दिले,
अ. ‘‘आपण व्यष्टी साधना चांगली होण्यासाठी या भूलोकीच्या वैकुंठात आलो आहोत. आपण त्याचा १०० टक्के लाभ करून घ्यायचा आहे. ही संधी पुन्हा मिळणार नाही. त्यासाठी ‘प्रतिदिन सारणी लिखाण कसे करता येईल ?’, याकडे लक्ष दिले पाहिजे. ‘सारणीत चुका लिहिल्याविना झोपायचे नाही. न्यूनतम पाच चुका सारणीत लिहायच्या’, असे ध्येय ठेवून आपण प्रयत्न करायला हवेत. मनात सवलत घेण्याचे विचार न आणता आपल्याला नकारात्मक विचाराशी लढायचे आहे आणि आपल्या गुरूंना अपेक्षित अशी साधना करायची आहे.
आ. तुम्ही प्रसारात सेवा करणारे साधक प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर आहात, तर आम्ही इथे आश्रमात रहाणारे साधक गोकुळात आहोत. गुरुदेवांचे सर्वांकडे लक्ष आहे. आपण गुरूंचे तळमळीने आज्ञापालन करूया.
इ. आपण भूलोकीच्या वैकुंठात रहात आहोत. ही संधी सगळ्यांनाच मिळत नाही. आपण गुरूंना अपेक्षित असे प्रयत्न केले, तर आपल्यावर गुरुकृपा होणारच आहे. तूही तसेच प्रयत्न कर.
त्या वेळी ‘प्रत्यक्ष गुरुमाऊली त्या साधकाच्या माध्यमातून मला सांगत आहे’, असे मला वाटले. ‘गुरूंनाच माझ्या साधनेची काळजी आहे’, हे लक्षात आले. सहसाधकाचे दृष्टीकोन ऐकून माझ्या मनाला उभारी मिळाली आणि आता ‘मलाही असेच प्रयत्न करायचे आहेत’, हा माझा निश्चय झाला. त्याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– श्री. कार्तिक साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१२.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |