रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी व्यक्त केलेले अभिप्राय
१. श्री. ए.एस्. संतोष, सिकंदराबाद, आंध्रप्रदेश.
अ. ‘रामनाथी आश्रमात सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्ती आहे’, असे जाणवते.
आ. ‘फलकावर स्वतःच्या चुका लिहिणे’, ही गोष्ट अतिशय प्रेरणादायी आहे.’ (६.६.२०१८)
२. श्री. शोवन सेनगुप्ता, सेवक, शास्त्र धर्म प्रचार सभा, प. बंगाल.
अ. ‘आश्रमातील साधकांचे आचरण, शिस्तबद्ध जीवन आणि परमात्म्याच्या चरणी असलेली शरणागती, यांतूनच रामनाथी आश्रमात बाहेरील समाजापेक्षा वेगळेपणा दिसून येतो.
आ. मला येथे संपूर्ण शांती, स्थिरतेतील आनंद आणि चैतन्य जाणवले.
इ. ‘साधकांनी अंतर्मुख होऊन स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करणे’, हे फलकावर लिहिलेल्या चुका पाहून शिकायला मिळाले.’ (६.६.२०१८)
३. डॉ. कौशिक चंद्र मल्लिक, उपसंपादक, ट्रुथ, शास्त्र धर्म प्रचार सभा, दक्षिण २४ परगना, पश्चिम बंगाल.
अ. ‘या जगात रामनाथी आश्रमासारखे पवित्र असे दुसरे स्थान नाही.
आ. मागील वर्षीपेक्षा या वर्षी आश्रमातील सात्त्विकतेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली आहे.
इ. रामनाथी आश्रमात दैवी चैतन्य असून सर्व साधकांमधील चैतन्यही वाढले आहे.
ई. आश्रमात आल्यानंतर विचारसरणीत पालट होतो आणि तो बाहेर प्रक्षेपित होत असल्याचे दिसते.’ (६.६.२०१८)