धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार
मुंबई – बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झालेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दोन लग्नांचा उल्लेख केलेला नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. माहिती लपवून ठेवल्याने आयोगाने मुंडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंडे यांनी त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहितीही लपवली आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.