इंडियन ऑईल आस्थापन ३० ते ४५ मिनिटांत सिलिंडर घरपोच पोचवणार
अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार
नवी देहली – सरकारी आस्थापन इंडियन ऑईलने आता तात्काळ सेवा देण्याची योजना बनवली आहे. यानुसार ग्रहकांनी मागणी केल्यानंतर केवळ ३० ते ४५ मिनिटांत सिलिंडर घरपोच देण्यात येणार आहे; मात्र यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. या योजनेचा प्रारंभ प्रत्येक राज्यातील एका शहरामध्ये प्रथम चालू करण्यात येणार आहे. १ फेब्रुवारीपासून ही सेवा प्रारंभ होण्याची शक्यता आहे.