जपानमध्ये गेल्या १० वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या दुप्पट झाल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता
|
|
टोकियो (जपान) – जपानमधील मुसलमानांची लोकसंख्या गेल्या १० वर्षांत दुप्पट झाली आहे. यात बाहेरून आलेल्या मुसलमानांसहित धर्मांतर करून मुसलमान झालेल्या जपान्यांचाही समावेश आहे. या लोकसंख्येत वाढ झाल्याने स्थानिक जपानी नागरिकांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे.
१. ‘इकॉनॉमिस्ट डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या मते, जपानच्या वसेडा विश्वविद्यालयाचे प्रा. तनाडा हिरोफुमी यांनी संशोधन करून एक अहवाल बनवला आहे. यात वर्ष २०१० मध्ये जपानमधील मुसलमानांची लोकसंख्या सुमारे १ लाख १० सहस्र होती; मात्र वर्ष २०१९ मध्ये त्यात वाढ होऊन ती २ लाख ३० सहस्र इतकी झाली आहे. यात ५० सहस्र जपान्यांनी धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला आहे.
As the government has sought to attract more foreign workers and students, the number of Muslims living in Japan, though small, has more than doubled in the past decade https://t.co/H1RzSuRGVV
— The Economist (@TheEconomist) January 8, 2021
२. मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यानंतर त्यांच्या मशिदींच्या संख्येतही वाढ झाली आहे. वर्ष २००१ मध्ये केवळ २४ असणार्या मशिदी आता ११० हून अधिक झाल्या आहेत.
३. ‘बीप्पू मुस्लिम असोसिएशन’चे प्रमुख अब्बास खान यांनी जपानमध्ये मशिदींच्या वाढलेल्या संख्येचे स्वागत केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मशिदींची संख्या वाढूनही मुसलमानांना अडचणी येत आहेत.
४. जपानची लोकसंख्या १२ कोटी ६० लाख आहे. येथील तरुण विवाह करण्याऐवजी नोकरी, व्यवसाय यांकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे जपानी लोकसंख्या न्यून होत आहे. भविष्यात जपानमध्ये युवकांच्या संख्येत घट होण्याचे संकट निर्माण होण्याच्या भीतीने सरकार विदेशी कामगार आणि विद्यार्थी यांना जपानमध्ये येण्यास आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
५. या स्थितीचा लाभ उठवत विदेशी मुसलमान आणि विद्यार्थी जपानमध्ये पोचले आहेत. ते स्थानिक लोकांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अन्य देशांतील मुसलमानांना तेथे आणून त्यांना वसवण्याचाही प्रयत्न करत आहेत. ‘बीप्पू मुस्लिम असोसिएशन’चे प्रमुख अब्बास खान हेही त्यांच्यामधीलच एक आहेत. ते मूळचे पाकिस्तानचे असून वर्ष २००१ मध्ये विद्यार्थी म्हणून ते जपानमध्ये आले होते आणि ते आता तेथे इस्लामचा प्रसार करत आहेत.
६. मुसलमानांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक जपानी बौद्ध नागरिकांमध्ये याचे पडसाद उमटत आहेत. स्थानिक बौद्धांकडून मसलमानांना मदरसे आणि दफनभूमी देण्यास विरोध केला जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, विदेशी लोकांना जपानमध्ये काम करण्याची किंवा रहाण्याची संमती दिली पाहिजे; मात्र बाहेरील लोकांनी स्थानिक संस्कृतीचा सन्मान केला पाहिजे.
(सौजन्य : Islam Channel)
दफनभूमीच्या मागणीला विरोध
मुसलमानांची लोकसंख्या वाढल्याने त्यांचा आता जपानमधील बहुसंख्य बौद्धांशी संघर्ष चालू झाला आहे. धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांनी आता अधिक दफनभूमीची मागणी केली आहे. जपानमध्ये बौद्ध मृतदेहांवर अग्नीसंस्कार करतात. त्यामुळे त्यांचे म्हणणे आहे की, मृतदेह दफन केल्याने भूमी अशुद्ध होईल आणि लोकांना योग्य प्रकारचे पाणी उपलब्ध होणार नाही.