मुंडेंवर आरोप करणार्या महिलेकडून भाजप नेत्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा
मुंबई – मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ज्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, तिने मला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला आहे.
या प्रकरणी हेगडे यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हेगडे यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, २०१० पासून ही महिला मला वेगवेगळ्या संपर्क क्रमांकांवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. तिला माझ्यासमवेत संबंध प्रस्थापित करायचे होते.