(म्हणे) ‘नथुराम गोडसे देशातील पहिला आतंकवादी आहे ! – काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह
|
काँग्रेस केवळ देशभक्तांचा अवमान करणेच शिकली ! – साध्वी प्रज्ञासिंह यांचे प्रत्युत्तर
भोपाळ (मध्यप्रदेश) – काँग्रेस केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकली आहे. त्यांच्या नेत्यांनी ‘भगवा आतंकवाद’ सारख्या शब्दांचा वापर केला आहे, याहून अधिक लज्जास्पद गोष्ट काय असू शकते ?, असे प्रत्युत्तर भाजपच्या येथील खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांना दिले आहे. ‘नथुराम गोडसे भारतातील पहिला आतंकवादी आहे’ असे विधान दिग्विजय सिंह यांनी केले होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळीही साध्वी प्रज्ञासिंह यांनी गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. यानंतर यावरून भाजपला स्पष्टीकरणही द्यावे लागले होते.
Congress has always abused the patriots. He has said ‘Bhagwa aatank’ (Saffron terror), what can be worse than this: BJP MP Pragya Singh Thakur on being asked ‘Congress leader Digvijaya Singh called Godse the first terrorist’ pic.twitter.com/mB0LlB3qL8
— ANI (@ANI) January 13, 2021