मांगोरहिल, वास्को येथील श्री अय्यप्पा मंदिरातील महोत्सवाला आजपासून प्रारंभ
वास्को – मांगोरहिल येथील श्री अय्यप्पा मंदिरात १३ ते २० जानेवारी या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ जानेवारील सायंकाळी ६.१५ वाजता त्रिकोडीयेट्टू, दीपाराधना, अंकुररोपणम्, रात्री ८.४५ वाजता अथझा पूजा, श्रीभूतबळी आणि हरिवरसनम्; १४ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता मकर विलाक्कू, महामृत्युंजय होम, गणपतीला कलशाभिषेक आणि श्री अय्यप्पा स्वामींना तुपाचा कलशाभिषेक करण्यात येणार आहे. १५ जानेवारीला नवग्रह प्रतिष्ठापना दिवस असल्याने सकाळी ९ वाजता नवग्रहांना कलशाभिषेक, तसेच अय्यप्पादेवाला दुधाचा अभिषेक करण्यात येईल. १६ जानेवारीला देवी प्रतिष्ठापना दिवस असल्याने सकाळी ९ वाजता देवीला कलशाभिषेक, तसेच अय्यप्पादेवाला पंचामृताचा कलशाभिषेक होणार आहे. १७ जानेवारीला उत्सवबलीपूजा होणार असून सकाळी ७.३० वाजता सुब्रह्मण्यम्स्वामीला (कार्तिकेयाला) कलशाभिषेक, सकाळी ८.३० वाजता श्री अय्यप्पादेवाला शहाळ्याचा कलशाभिषेक आणि सकाळी ९.३० वाजता मरप्पानी होणार आहे. १८ जानेवारीला अय्यप्पा प्रतिष्ठापना दिवस असल्याने सकाळी ८ वाजता कलशपूजा, सकाळी ९.३० वाजता मरप्पानी आणि सकाळी १० वाजता कलाशम् इझुन्नेलिप्पू आणि अय्यप्पादेवाला कलशाभिषेक होणार आहे. १९ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता कराप्पास्वामी आणि नागदेवतेला कलशाभिषेक, तसेच अय्यप्पादेवाला मधाचा कलशाभिषेक आणि रात्री ९ वाजता पल्लीवेट्टा कार्यक्रम होणार आहे. २० जानेवारीला सकाळी ६ वाजता पल्लीयुनरथल, अभिषेक, अकथेझुन्नेलिप्पू, पूजा, सायंकाळी ५.३० वाजता अरट्टू बलीपूजा, अरट्टू, सायंकाळी ६.३० वाजता अरट्टू थिरीचेझुन्नेलिप्पू, परयीडल, कोडीयीरक्कम, करट्टू कलशम्, दीपाराधना आणि हरिवरसनम् होणार आहे.