ब्रेक निकामी झाल्याने घारपी घाटात एस्.टी.ला अपघात
प्रवासी किरकोळ घायाळ
सावंतवाडी – घारपी येथून बांद्याच्या दिशेने येतांना घारपी-बांदा ही एस्.टी. बस घारपी घाटात कोसळून अपघात झाला. ही घटना १२ जानेवारीला सकाळी घडली. बसमध्ये एकूण ११ प्रवासी होते. अपघाताची माहिती समजताच असनिये आणि घारपी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील विद्यार्थी आणि इतर प्रवासी यांना गाडीतून बाहेर काढले. या अपघातात बसचालकासह विद्यार्थी, घारपी येथील काही प्रवासी किरकोळ घायाळ झाले आहेत. घायाळांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले.