कांदळवन अवैधरित्या तोडणार्यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
अशी मागणी का करावी लागते, संबंधित प्रशासकीय विभागा झोपा काढत आहे का ?
सावंतवाडी – तालुक्यातील तळवणे गावात कांदळवनाची अवैध तोड होत आहे; मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
‘कांदळवन विभागाचे सिंधुदुर्गचे मुख्य कार्यालय मालवण येथे आहे. त्यामुळे या मागणी संदर्भातील तक्रार अर्ज त्या ठिकाणी नेऊन द्यावा. त्यानंतर संबंधित विभाग त्यावर नक्कीच कारवाई करील’, असे साहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी सांगितले. तसेच ‘ज्या अधिकार्यांनी या विषयात कामचुकारपणा केला असेल, तर त्यांच्यावर कारवाई करू’, असे जळगावकर यांनी सांगितले. या वेळी ‘आरोंदा कांदळवन समिती’चे सदस्य गोकुळदास मोठे, बाबुराव भोगले दिनेश भोगले आदी उपस्थित होते.