परात्पर गुरु डॉक्टरांच्या आठवणीने त्यांच्यासाठी चित्ररूप लिखाण करणारी कु. आरती सुतार !
कु. आरती सुतार यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आठवणीने त्यांना उद्देशून चित्ररूप लिखाण केले ते येथे देत आहोत. उदाहरणस्वरूप एक चित्र येथे प्रसिद्ध करत आहोत.
पहिल्या चित्रातील लिखाण
देवा, कधी असा दिवस येईल ?
देवा, प्रतिदिन तुमच्या दरवाजाकडे बसून तुम्हाला बघत असते. कधीही पाहिले, तर तुम्ही काही ना काही करतच असता. तुमचे चरण दिसतच नाहीत. आता वेळ आली आहे आणि हा देह तुमच्या चरणी अर्पण करायचा आहे. पुष्कळ आतुरतेने वाट बघत आहे त्या क्षणाची.. परम पूज्य..
दुसर्या चित्रातील लिखाण
परम पूज्य, या चित्राप्रमाणे मला सगळे करायचे आहे. तुम्ही सांगितलेली व्यष्टी साधना आणि भक्ती करायची आहे. तुम्ही जे काही सांगितले आहे, ते प्रामाणिकपणे करायचे आहे. तेही कोणतीही अपेक्षा न ठेवता आणि निरपेक्षपणे करायचे आहे. तसेच तुम्ही सांगितलेली समष्टी साधना आणि प्रसार करायचा आहे. हिंदु राष्ट्र येण्यासाठी तळमळीने प्रयत्न करायचे आहेत. तसेच मला या मनुष्यजन्मात सगळे अनुभवयाचे आहे. मला पुन्हा जन्म घ्यायचा नाही. जे काही आहे, ते तुमच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि तुमचेच नाम घेत श्वास सोडायचा आहे.
तिसर्या चित्रातील लिखाण
परम पूज्य, मला या तुमच्या शाळेत नेहमी न चुकता यायचे आहे. मला कधीच ती शाळा चुकवायची नाही. तसेच माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्यासाठी मी तुमच्या चरणी क्षमा मागते. मला तुमचे चरण कधीच सोडायचे नाहीत. नेहमी तुमची सेवा करायची आहे आणि नेहमी तुमच्याच जवळ रहायचे आहे.
चौथ्या चित्रातील लिखाण
परम पूज्य, ‘तुम्ही या फुलाला जवळ कराल ना ? नेहमी तुमच्या चरणांपाशी ठेवाल ना ? या एका छोट्याशा बाळाचा हात धरून तुम्ही पुढे घेऊन जाल ना ? प्रश्न चिन्ह असले, तरी माझा आतला आवाज सांगतो, ‘तुम्ही आजपर्यंत जशी साथ दिली आहे, तशीच पुढेही देणार आहात.’ मीच कमी पडते रे देवा. त्यासाठी मला क्षमा करा. तुमची साथ अशीच राहो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’
‘परम पूज्य, मधेमधे मला तुमची पुष्कळ आठवण येते. मी सांगू शकत नाही, ‘तुमच्याजवळ ती हाक पोचते का हो ?’ मला घडायचे आहे; पण मी अल्प पडते. असे असतांनाही तुम्ही माझी साथ कधीच सोडली नाहीत. माझे प्रयत्न अल्प असूनही ‘कठीण काळात तुम्हीच माझ्या समवेत आहात’, याची प्रचीती दिलीत. तुमच्याच कृपेमुळे मी आज जिवंत आहे आणि तुमच्याशी जोडले गेले आहे. माझी साधना अल्प होत असूनही तुम्ही माझा हात सोडला नाही, तसाच घट्ट धरून आहात अन् मला सावरत प्रयत्न करून घेत आहात. त्यासाठी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच पडेल; पण मला एक समजले, ते म्हणजे मला बळ देणारे तुम्हीच, माझ्याकडून प्रयत्न करवून घेणारेही तुम्हीच, मला घडवणारेही तुम्हीच, माझी सगळी काळजी घेणारेही तुम्हीच आणि मला पुढे घेऊन जाणारेही तुम्हीच आहात. परम पूज्य, सगळे काही तुम्हीच आणि तुम्हीच आहात माझ्यासाठी ! एवढच सांगून सर्वकाही तुमच्या चरणी अर्पण करत आहे.’
– कु. आरती सुतार, म्हापसा, गोवा. (२५.७.२०२०)
देवासाठीच जगावे ।
कसे सांगावे या हृदयातले विचार ।
किती सांगावे या हृदयातले विचार ।
सांगून सांगून थांबतच नाही ।
सतत एकच वाटते ‘देव हवा आहे’ ॥ १ ॥
देवाविना जगणे कठीण आहे ।
देवासाठीच जगावे, देवासाठीच मरावे ।
देवाविना देह जगूच नये ।
हाच विचार अंतर्मनी असे ॥ २ ॥
प्रत्येक श्वास देवाची आठवण करून देणारा असो ।
प्रत्येक क्षण देवाजवळ घेऊन जाणारा असो ।
प्रत्येक क्षण देवासाठी तळमळत असो ।
प्रत्येक क्षण देवासाठी व्याकुळ होवो ।
प्रत्येक क्षण देवासाठीच धडपडणारा असो ।
हीच प्रार्थना ईश्वरचरणी ॥ ३ ॥
– देवासाठी सतत तळमळणारी कु. आरती सुतार (२९.८.२०१४)
देव हवा आहे ।
देवा, प्रत्येक पत्रात एकच म्हटले आहे ।
ते म्हणजे ‘देव हवा आहे’ ।
देवासमवेतचा क्षण सतत अनुभवायचा आहे ।
देवासमवेतच रहायचे आहे ॥ १ ॥
देवालाच विचारून करायचे आहे ।
मुळात पूर्णपणे देवाशी जोडायचे आहे ।
महाशून्यात जायचे आहे ।
सतत आनंदी राहून साधना करायची आहे ॥ २ ॥
दिवस-रात्र जागून प्रयत्न करायचे आहेत ।
देवा, आतातरी कृपा कर या दगडावर (टीप १) ।
घे ना या दगडाला तुझ्या चरणापाशी ।
घे ना या दगडाला तुझ्या हृदयात ।
कृपा कर भगवंता, कृपा कर ॥ ३ ॥
टीप १ – माझ्यावर
– देवासाठी सतत तळमळणारी कु. आरती सुतार,(२९.८.२०१४)
साधनेची अंगाई !‘सेवा करत असतांना माझ्या मनाचा थोडा संघर्ष होत होता; म्हणून मी सकारात्मक विचार करून आनंदी रहाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा मी ‘कृष्णाई, मला प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाता येऊ दे. मला शिकता येऊ दे. मला प्रत्येक प्रसंग स्वीकारता येऊन समजून घेता येऊ दे आणि त्याचे आकलन होऊ दे. मला आनंदी रहाता येऊ दे’, अशी प्रार्थना केली. त्या वेळी देवाने मला पुढील ओळी सुचवल्या आणि आलेला ताण नाहीसा करून आनंद दिला. जेथे जेथे कृष्णाई । श्रीकृष्णाची, – कु. आरती सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०१४) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |