प्रत्येक गोष्ट पैशाच्या भाषेत मोजणारे सर्वोच्च न्यायालय !
घरी काम करणार्या गृहिणींचे कामही त्यांच्या नोकरी करणार्या पतीच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांनाही वेतन मिळायला हवे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले. ‘गृहिणींना वेतन किती असावे ?, हे ठरवण्याच्या संदर्भात काही ठोस साचेबद्ध नियम करता येणार नसले, तरी त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळावा असा मुख्य हेतू यामागे हवा’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.