राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात महिलेकडून अत्याचार केल्याचा आरोप
ओशिवरा पोलीस ठाण्यात महिलेची तक्रार प्रविष्ट
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार दिली आहे, अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली.
तथापि पोलिसांनी याची नोंद न घेतल्याने तिने याविषयी मुंबई पोलीस आयुक्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सौ. सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करून तिने माहिती दिली आहे. या महिलेने १० जानेवारी या दिवशी तक्रार दिली असून पोलिसांनी ११ जानेवारी या दिवशी त्यांचा अर्ज स्वीकारला आहे.
महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, वर्ष २००६ पासून माझ्यावर अत्याचार चालू होते. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे, तसेच याचे व्हिडिओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत साहाय्य करण्याची साद घातली आहे.
वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असून माझी अपकीर्ती करणारे आहेत ! – धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री