गोरेगाव (जिल्हा हिंगोली) येथे निवडणुकीच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी ६० जणांवर गुन्हा नोंद
हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे निवडणुकीच्या कारणावरून १० जानेवारी या दिवशी हाणामारी झाली.
या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी ६० जणांवर गुन्हा नोंद केला आहे. तरी दक्षतेचा उपाय म्हणून रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. गोरेगाव येथील संजय कावरखे १० जानेवारीच्या रात्री कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी बसले होते.
या वेळी ‘तू आमच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणूक का लढवतो ?’ या कारणावरून राजेश पाटील, अजित कावरखे, विक्रम कावरखे यांच्यासह ६० जणांनी संजय कावरखे यांना मारहाण केली, तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संजय कावरखे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.