धारबांदोडा, उसगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्या धर्मांधाला अटक
गोव्यातील मुलीबाळीही आता धर्मांधांच्या वासनांधतेची शिकार !
फोंडा, ११ जानेवरी (वार्ता.) – धारबांदोडा येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अब्दुल सय्यद या धर्मांधाला पोलिसांनी १० जानेवारी या दिवशी मडगाव रेल्वेस्थानकावर अटक करून त्या मुलीची सुटका केली. या प्रकरणी आरोपी अब्दुल सय्यद याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि ३६३ नुसार आणि गोवा बाल हक्क कायद्याच्या कलम ८ नुसार गुन्हा नोंद केला असल्याचे फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोहन गावडे यांनी सांगितले. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची तक्रार तिच्या आईने फोंडा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला मडगाव रेल्वेस्थानकावर अटक केली.