‘काळजी करणे’ या माझ्या स्वभावदोषावर मात करण्यासाठी शिवाचा नामजप करणे आणि तो केल्यावर मनाला शांत वाटणे
‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावर व्याधीनुसार कुठला नामजप करायचा ते बघून ‘काळजी करणे’ या माझ्या स्वभावदोषावर मात करण्यासाठी शिवाचा नामजप करणे आणि तो केल्यावर मनाला शांत वाटणे
‘माझा ‘काळजी करणे’ हा स्वभावदोष आहे. माझी मुलगी गायत्री हिला शारीरिक त्रास होतो. तेव्हा ती वेगवेगळ्या त्रासांसाठी वेगवेगळे नामजपादी उपाय करत असते. तिने मला ‘काळजी करणे’ या स्वभावदोषावर मात करण्यासाठी शिवाचा नामजप करायला सांगितला. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावर व्याधीनुसार कुठला नामजप करायचा, ते बघून तिने तो नामजप मला सांगितला होता. मी तो नामजप करायला बसले. तेव्हा डोळे मिटून प्रथम शिवाचे स्मरण केले आणि नंतर नामजपाला आरंभ केला. ‘काही वेळाने माझ्या समोर भगवान शिव बसले आहेत’, असे मला दिसले. त्या वेळी मनाला पुष्कळ शांत वाटत होते आणि आनंद मिळत होता.’
– श्रीमती सुगतादेवी, कण्णूर, केरळ. (१०.६.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |