‘नियोजनाचा अभाव’ या स्वभावदोषावर मात करण्याचा प्रयत्न करणारी कण्णूर (केरळ) येथील कु. गायत्री अनिल !
गुरुदेवांना प्रार्थना करून ‘नियोजनाचा अभाव’ या स्वभावदोषावर मात करण्याचा प्रयत्न करणारी कण्णूर (केरळ) येथील कु. गायत्री अनिल !
‘माझ्यात नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे ‘साधना, घरातील कामे आणि नोकरी हे सर्व नियोजनात कसे बसवायचे ?’, हे मला कळत नव्हते. मी स्वभावदोष-निर्मूलन सत्संगात सांगितल्याप्रमाणे स्वतःत पालट करण्याचे निश्चित केले. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर देवाने मला गुरूंना प्रार्थना करण्याचे सुचवले. त्याप्रमाणे मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, तुम्ही मला ‘आज मी काय करावे ?’, हे कृपया सांगा आणि तुम्हाला आवडेल असे करवून घ्या.’ मी प्रतिदिन अंघोळ केल्यावर आईला स्वयंपाकघरात साहाय्य न करता वास्तूशुद्धी करते, देवाजवळ दिवा लावते आणि प्रार्थना करते. त्या दिवशी गुरुदेवांनी मला सुचवले, ‘प्रथम आपल्या आईला साहाय्य कर आणि नंतर आपली सेवा किंवा इतर गोष्टी कर.’ त्याप्रमाणे मी स्नान झाल्यावर लगेच आईला साहाय्य केले.
देवघरात मी देवांच्या चित्रांची रचना योग्य पद्धतीने केली नव्हती. ती गुरुदेवांनी योग्य पद्धतीने करण्यास सुचवले आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व देवतांच्या चित्रांची रचना पालटून मी देवघर स्वच्छ केले. देवाच्या कृपेमुळे मला देवांची चित्रे ठेवण्याची योग्य पद्धत समजली. त्यामुळे आता देवघरात गेल्यावर मला पुष्कळ आनंद मिळतो आणि मन अधिक उत्साही होते. त्या दिवशी मी देवाच्या कृपेमुळे अधिक सेवा करू शकले.’
– कु. गायत्री अनिल, कण्णूर, केरळ. (४.५.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |