गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या समवेत बैठक घेणारा पोलीस हवालदार निलंबित
पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचे हत्या प्रकरण
असे गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?
पुणे – जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एस्.बी.आय.च्या प्रवेशद्वारावर ५ ऑक्टोबर या दिवशी व्यावसायिक राजेश कानाबार यांची आर्थिक वादातून हत्या झाली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी आणि मुख्य सूत्रधार राजेश साळुंखे आणि त्याचा साथीदार राकेश बुरटे यांच्यासह बैठक घेणार्या चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार परमेश्वर सोनके यांनी निष्काळजीपणा आणि दायित्वशून्य वर्तन केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. (अशा पोलिसांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)