श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ‘ऑनलाईन पास’ची सक्ती रहित
प्रतिदिन ८ सहस्र भाविकांना मुखदर्शन घेता येणार
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन पास’ची सक्ती रहित करण्यात आली असून आता ‘पास’विना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहनीनाथ औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी या दिवशी मंदिर समितीची बैठक पार पडली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
दिवाळी पाडव्यापासून कोरोनाचे सर्व नियम पाळून ‘ऑनलाईन’ पासद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रतिदिन ५ सहस्र भाविकांना मुखदर्शन घेता येत होते. १२ जानेवारीपासून प्रतिदिन ८ सहस्र भाविकांना मुखदर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.