लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत अदखलपात्र गुन्हा नोंद
लमाण समाजातील स्त्रियांविषयी दिलेली माहिती ही भावना दुखावणारी असल्याचा आरोप
पिंपरी – भालचंद्र नेमाडे यांच्या वर्ष २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकात लमाण समाजातील स्त्रियांविषयी दिलेली माहिती ही भावना दुखावणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘लमाण समाजाच्या महिला हडप्पा काळापासून पुढे वेश्या व्यवसाय करत’, असे या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रमेश खेमू राठोड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे. भालचंद्र नेमाडे यांनी लमाण समाजाविषयी पुरावे द्यावे, नाहीतर पुस्तक मागे घ्यावे, अशी मागणीही तक्रारदार रमेश राठोड यांनी केली आहे.