इतिहासात प्रथमच नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडेरायाची यात्रा रहित
नांदेड – दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडेरायाची यात्रा कोरोनामुळे इतिहासात प्रथमच रहित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून व्यापार्यांना प्रदर्शन न लावण्याचे आदेश दिले आहेत. श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडेरायाच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. माळेगाव येथील यात्रा प्रतिवर्षी ४ दिवस चालते, तसेच जिल्हा परिषदेकडून विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांचे आयोजन केले जाते.