देशातील ९ राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचे संक्रमण

नवी देहली – देशात गेल्या काही दिवसांपासून बर्ड फ्ल्यूमुळे शेकडो पक्षांचा मृत्यू होत असतांना आता देशातील हिमाचल प्रदेश, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळ या ९ राज्यांत बर्ड फ्ल्यूचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.

कृषीविषयक संसदीय समितीने मत्स्यव्यवसाय, पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अधिकार्‍यांची ११ जानेवारीला याविषयी बैठक बोलावली होती. या बैठकीत पशुवैद्यकीय सेवांच्या सद्य:स्थिती आणि जनावरांच्या लसींच्या उपलब्धतेविषयी चर्चा करण्यात आली.