बालगंधर्व नाट्यगृहाच्या सुधारणेविषयी रंगकर्मींचे मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
सांगली – मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या सुधारणेविषयी रंगकर्मीनी ९ जानेवारी या दिवशी नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. नाट्यगृहात कलाकार, नाट्यकर्मी, प्रेक्षक यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आहे. नाट्यगृहाच्या आवारातील अतिक्रमणे काढून नाट्यगृहास पूर्णत्वाचा दाखला द्यावा, यांसह अन्य मागण्या निवेदनात केल्या आहेत. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या वेळी नाट्यकर्मी सर्वश्री श्रेयस गाडगीळ, धनंजय जोशी, राजेंद्र नातू यांसह अन्य उपस्थित होते.