भंडारा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल ! – उद्धव ठाकरे
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात ‘शिशू केअर युनिट’ला लागलेल्या आगीत १० बालके मृत झाल्याचे प्रकरण
भंडारा – येथील जिल्हा रुग्णालयात ‘शिशू केअर युनिट’ला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले. मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाची पहाणी केली, तसेच मृत बालकांच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
(सौजन्य : ABP MAJHA)
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘या वेळी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते. केवळ या कुटुंबांसमोर मी हात जोडून उभा होतो. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी चौकशी समिती चौकशी करत आहे. एका मासात या समितीचा अहवाल येईल.’’ राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘इलेक्ट्रिक ऑडिट’ करण्याचा आदेश दिल्याचेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.