नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे आज उद्घाटन
पणजी (पत्रक) – गोवा मनोरंजन संस्थेचे नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे उद्घाटन ११ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता संस्थेच्या संकुलात राज्याचे मुख्यमंत्री तथा गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पणजीचे आमदार आतानासियो (बाबूश) मोन्सेरात, पणजीचे महापौर उदय मडकईकर, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा यांची विशेष उपस्थिती असेल.