शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड
नगर – नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त पदावर अध्यक्षपदी भागवत सोपान बानकर आणि उपाध्यक्षपदी विकास नानासाहेब बानकर यांची निवड करण्यात आली आहे. हे देवस्थान राज्य सरकारच्या कह्यात असून मागील महिन्यात तेथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी २३ डिसेंबर या दिवशी ११ नवीन विश्वस्तांची निवड घोषित केली होती.