भारतात प्रसारित होणार्या हिंदी चित्रपटांमध्ये उर्दू आणि इंग्रजी मिश्रित हिंदीचा वापर !
१० जानेवारीला झाला जागतिक हिंदी दिन !
|
हिंदी चित्रपटांद्वारे हिंदीवर उर्दू आणि इंग्रजी भाषांचे होणारे आक्रमण गंभीर आहे. याचा प्रभाव समाजावर होतो ! त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांनी हिंदीच्या शुद्धीसाठी शालेय स्तरावरून, तसेच मनोरंजन आदी क्षेत्रांतूनही प्रयत्न केले पाहिजेत !
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टी ज्याला हॉलीवूडच्या नावाच्या धर्तीवर ‘बॉलीवूड’ म्हटले जाते तिचे कमाईचे साधन हिंदी आहे; मात्र कामकाज इंग्रजीतून केले जाते. चित्रपटांमध्ये वापरण्यात येणारी हिंदी ही ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात उर्दूमिश्रित असते. चित्रपटाचे लेखक, पटकथा लेखक, गीतकार बहुतेक मुसलमान असल्याने, तसेच हिंदु लेखकही उर्दूमिश्रित हिंदीचा वापर करत असल्याने चित्रपटात शुद्ध हिंदीचा वापर होत नाही. त्याही पुढे जाऊन चित्रपटांमध्ये शुद्ध हिंदीचा वापर झाल्यास त्याचे लोकांना आकलन होणार नाही, इतकी उर्दूमिश्रित हिंदी आज देशात प्रचलित आहे.
१० जानेवारीला जागतिक हिंदी दिन साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपटदृष्टीच्या कामकाजाचा आढावा घेतल्यावर ही माहिती पुढे आली आहे. हिंदी चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री यांना हिंदी नीट येत नसल्याने त्यांना हिंदी शिकवणारे शिक्षक ठेवावे लागतात, तसेच त्यांना इंग्रजीमधून हिंदी वाक्य लिहून द्यावी लागतात, अशीही माहिती पुढे आली आहे.
#worldhindiday2021: Here are the top #Universities across the world that offer Hindi courses https://t.co/TcNfxEinXA
— IE Education Jobs (@ieeducation_job) January 10, 2021
१. हिंदी विषयाच्या शिक्षिका पल्लवी सिंह यांनी सांगितले की, हिंदी चित्रपटदृष्टीत उच्चभ्रू, इंग्रजी संस्कृतीत वाढलेल्या व्यक्तींचा वावर असतो; मात्र हिंदी येत नसल्याने त्यांना अभिनयातही अडचण येते. यामुळे या व्यक्ती हिंदी शिकतात.
२. अभिनेत्यांना हिंदी भाषेचे धडे देणारे आनंद मिश्रा यांनी सांगितले की, दिग्दर्शक आणि अभिनेते यांना कामासाठी हिंदी शिकणे आवश्यक असते. इतर भागातून येणारेही योग्य उच्चारासाठी हिंदी शिकतात. तसेच हिंदी चित्रपटांमध्ये हिंदीचा किती उपयोग करायचा आहे, हे निर्मात्यांवरही अवलंबून असते.
३. निर्माते आनंद पंडित म्हणाले, ‘‘संवाद रोमन इंग्रजीत लिहिले जात असले तरी त्याचा पाया हिंदीचा असतो. हिंदीकडे कधीही दुर्लक्ष करता येणार नाही. उलट आता तर अनेक निर्माते योग्य उच्चाराचा सराव करतात.’’